Pune District : डोळ्यासारख्या नाजूक भागाची जास्त काळजी घ्यावी-संजय थोरात

मंचर : डोळ्यातील मोतीबिंदूवर लवकर इलाज केला नाही,तर कायमचं अंधत्व येऊ शकतात असे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. डोळे हा शरीरातील खूप महत्त्वाचा व नाजूक भाग असल्याने काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय थोरात यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय थोरात यांच्या माध्यमातून घेण्यात आले होते. आरोग्य शिबिराला एकूण ८९२ नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
मोफत आरोग्य शिबिरामध्ये कॅन्सर तपासणी, मोफत हृदयरोग, मधुमेह, अस्थिरोग, सर्व स्त्रीरोग,डोळे आदी मोफत तपासणी करण्यात आली. तसेच ५८ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची नारायणगाव येथील पद्मश्री डॉ. मनोहर डोळे फाउंडेशन येथे संजय थोरात यांनी भेट घेऊन रुग्णांना मार्गदर्शन केले. डोळे फाउंडेशन आणि रुग्णांच्या वतीने संजय थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
माझे डोळे खूप दुखत होते. मी दोन ठिकाणी चौकशी केली. त्या ठिकाणी मला जास्त पैसे सांगितले होते. माझी परिस्थिती नव्हती. त्यामुळे मी शस्त्रक्रिया केली नाही. परंतु या डोळ्यांच्या शिबिरात माझी डोळ्यांची शस्त्रक्रिया मोफत झाली.
-वंदना गांजाळे, मंचर.





