Pune District : कावीळचा धोका टाळण्यासाठी काळजी घ्या

– इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ली यांचे आवाहन
इंदापूर – पावसाळ्यात अनेक आजार डोके वर काढतात. यात कावीळ आजाराचाही समावेश आहे.पावसात पाण्याचे प्रदुषण,अन्नाची अशुध्दता यामुळे काविळीचा प्रसार वाढतो. योग्य काळजी घेतल्यास हा आजार टाळता येऊ शकतो. इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी कावीळचा धोका टाळण्यासाठी,काळजी घ्यावी.असे आवाहन इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ली यांनी केले आहे.
डॉ. नामपल्ली म्हणाले,पावसाळ्यात स्वच्छतेसह शुध्द व पूर्ण शिजलेले अन्न खावे,कावीळ टाळण्यासाठी उकळलेले, फिल्टर केलेले,पाणी प्यावे,घरी तयार केलेले स्वच्छ अन्न खावे,उघड्यावर मिळणाऱ्या अन्न पदार्थांपासून दूर राहावे, पावसाळ्यात विविध आजारांचा धोका वाढतो. यात काविळचाही समावेश आहे.
दुषित पाणी पिणे,उघड्यावर मिळणारे किवा निट न शिजविलेले अन्न खाणे,हात स्वच्छ धुतल्या शिवाय जेवण करणे, कावीळ संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे अशा विविध कारणांमुळे कावीळ आजार होतो. योग्य दक्षता घेतल्यास सदर आजार टाळता येऊ शकतो.जेवण करताना हात स्वच्छ धुवावेत,कावीळ म्हणजे यकृताचा दाह किवा सुज होणे. मात्र, पावसाळ्यात या आजारांचा धोकाही दुप्पटीने वाढतो.काविळाची लक्षणे दिसल्यास वेळेवर उपचार घ्यावेत,उपजिल्हा रुग्णालया मार्फत तपासणी करुन घ्यावी.
” कावीळ आजाराचा धोका टाळा “
कावीळ बरोबर इतर आजारही होतात.योग्य काळजी व खबरदारी घेतल्यास सदर आजार टाळता येऊ शकतात.लक्षणे आढळल्यास उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे उपचार घ्यावेत,असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





