पुणे जिल्हा : मालवणप्रकरणात दोषींवर कारवाई करा

राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी
बारामती : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर युगपुरूष श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा उभारावा व या प्रकरणातील दोषी व्यक्तींविरूध्द कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बारामती तालुका राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार गणेश शिंदे यांना देण्यात आले आहे.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर युगपुरूष श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटना झाली, हे वेदनादायी आहे. त्याबदद्ल बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने याचा आम्ही निषेध करतो. केवळ आठ महिन्यांमध्ये हा पुतळा पडतो, हे अनाकलनीय असून पुतळयाची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. या घटनेत जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे संभाजी होळकर, धनवान वादक, राजवर्धन शिंदे, सचिन सातव, सुनील पवार, पोपटराव गावडे, अविनाश बांदल, डॉ. अनिल सोरटे, अनिता गायकवाड, संजय भोसले, सूर्यकांत पिसाळ, रेहान शेख, रंजीत धुमाळ, नितीन आटोळे, राजेंद्र गावडे, नारायण कोळेकर, वैभव गायकवाड, भरत खैरे, तनवीर इनामदार, ॲड. दत्ता बोरकर, ॲड. नवनाथ भोसले, विजया खटके, नाना नवले, साधू बल्लाळ, कौतुभ चव्हाण, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.





