Pune District : खेड पोलीस निरीक्षकपदी सुभाष चव्हाण
Updated On:

राजगुरूनगर : खेड ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष सदाशिव चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण 2006 मध्ये सेवेत दाखल झाले असून त्यांनी राज्याच्या विविध भागात सेवा बजावली आहे.
त्यात औरंगाबाद शहरात, गोंदिया, ठाणे ग्रामीण, अहमदनगर या विभागांचा समावेश आहे. ते पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक बारामती येथे यापूर्वी कार्यरत होते.
खेड पोलीस ठाण्यात रुजु झाल्यानंतर त्यांचे विविध संस्था, संघटना, व्यक्तींकडून स्वागत केले जात आहे. त्यांनी 2013 मध्ये नक्षलग्रस्त भागातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र पोलीस विभागाचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.





