पेठ : पेठ (ता.आंबेगाव) येथील श्री वाकेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेत घवघवीत यश संपादन केले, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक भानुदास धुमाळ यांनी दिली. शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला या दोन्ही परीक्षांचा श्री वाकेश्वर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. एलिमेंटरी परीक्षेत एकूण ३६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
त्यापैकी १८ विद्यार्थ्यांना असल्याने अ श्रेणी प्राप्त झाली. तसेच ब श्रेणीत सोळा विद्यार्थी व क श्रेणीत दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
अ श्रेणी प्राप्त विद्यार्थी खालीलप्रमाणे : अंजली ढमाले, अंजली सोनवणे, तन्मय कंधारे, श्रेयस पवार, रियाल शेख, सिद्धार्थ शिंदे, स्पर्श बेगडे, सोहम माठे, मधुरा घेवडे, रोनक राठोड, पार्थ तळेकर, प्रीतम शेलार, कस्तुरा भालेकर, कार्तिकी ढमाले, शुभांगी डिस्पळ, तपस्या कराळे, सानिका शिंदे.
तसेच इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेत एकूण ३५विद्यार्थी प्रविष्ट झाले. पैकी अ श्रेणीत १९ विद्यार्थी व ब श्रेणी १३ विद्यार्थी तर क श्रेणी तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अ श्रेणी प्राप्त विद्यार्थी खालील प्रमाणे ईश्वरी धुमाळ, आदित्य ढमाले, ईश्वरी चिकणे, श्रेया मनकर, समीक्षा एरंडे, अनुराधा नाईकरे, मोनिका नलावडे, पियुष गावडे, ओम नवले, तन्मय एरंडे, कुणाल गटे, ओम गटे, कार्तिकी राजगुरू, कार्तिकी गावडे, दीप्ती पवळे, संचिता कराळे, भक्ती ढमाले, संस्कृती सणस.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक हेमंत गाडेकर यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल कला शिक्षक हेमंत गाडेकर यांचा विशेष सत्कार संचालक मंडळ, ग्रामस्थ यांनी केला. मुख्याध्यापक भानुदास धुमाळ पर्यवेक्षक संजय पवळे तसेच वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ पेठ चे सर्व पदाधिकारी संचालक व सर्व ग्रामस्थ पेठ व सर्व शिक्षक शिक्षकांवर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.