पुणे जिल्हा : द्राक्षशेतीत काटेकोर व्यवस्थापन हवे

डॉ. सुजय सहा : तरंगवाडी येथे शिवार फेरी व्यवस्थापन चर्चासत्र
इंदापूर – शेतीमध्ये काटेकोर व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ रोग शास्त्रज्ञ रडॉ. सुजय सहा यांनी केले.
तरंगवाडी येथे आयोजित द्राक्ष शिवार फेरी व कीड रोग व्यवस्थापन चर्चासत्रात ते बोलत होते. द्राक्ष बागेमध्ये येणाऱ्या केवडा (डाऊनी), भुरी (पावडरी) व करपा रोग व्यवस्थापनाबद्दल त्यांनी उपस्थित बागायतदारांना सखोल मार्गदर्शन केले. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. दीपेंद्र यादव यांनी द्राक्ष बागेमध्ये येणाऱ्या विविध किडी व त्यांच्या व्यवस्थापनाबद्दल बागायतदारांना मार्गदर्शन केले.
भीतीपोटी बागायतदार मोठ्या प्रमाणावर फवारण्या घेतात; परंतु असे न करता आपल्या बागेतील निरीक्षणांनुसार फवारणी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तालुका कृषी अधिकारी भाऊसो रुपनवर यांनी बागायतदारांनी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा व कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,.
महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी शिवारफेरीमुळे बागायतदारांमध्ये विचारांची देवाण-घेवाण तसेच आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास शिवाजी तरंगे, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, साहेबराव मदने, उमेश घोगरे, चंद्रकांत माळी, मनोज मोरे, शिवाजी करे, पिनू मोरे, अतुल मोरे, विजय जगताप, संपत बुटे, माऊली शिंदे, विष्णू हरणावळ, अशोक टकले, मामासाहेब डोंबाळे, हनुमंत तरंगे, अविनाश तरंगे, समाधान तरंगे, बापूराव मदने आदी उपस्थित होते.





