Pune District : महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा उत्साहात

भोर : महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना,महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा, जिल्हा कार्यकारिणी कार्यशाळा व भोर वेल्हे तालुका त्रेवार्षिक अधिवेशन बळीराजा मंगल कार्यालय धांगवडी (ता.भोर) येथ उत्साहात संपन्न झाले.
मान्यवरांचा पुस्तक व गुलाब पुष्प भेट देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षक समिती वाटचाल, प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न व सेवा, शिक्षक समिती संघटन व बांधणी, संघटना व पदाधिकारी, शासकीय उपक्रम या सह अनेक विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात पुणे जिल्हा कार्यशाळा तसेच जिल्हा, राज्यभोर, राजगड तालुक्यातील नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. कार्यकारिणी, नूतन पदाधिकारी सन्मान मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
उपस्थित जिल्हा व तालुका समितीचे पदाधिकारी व शिक्षकांनी आपल्या विविध समस्या व प्रश्न राज्य कार्यकारिणीसमोर मांडल्या. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, अधिकारी, पदाधिकारी यांच्याकडे यां विषयांवर गांभीर्यपूर्वक चर्चा करण्याचे आश्वासन राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. यां प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षक समितीचे वतीने तयार करण्यात आलेल्या समितीपर्व २०२५ व पुरंदर तालुका शिक्षक समिती या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन भोर व वेल्हे तालुका शिक्षक समिती यांचे वतीने करण्यात आले होते.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्याक्ष विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्य नेते उदय शिंदे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, कार्याध्यक्ष सयाजी पाटील, उपाध्यक्ष राजन सावंत, महिला अध्यक्ष वर्षा केनवडे, उपाध्यक्ष राजन सावंत, राज्य सल्लागार महादेव माळवदकर, कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, विभागीय संघटक चंद्रकांत डोके, पुणे जिल्हाध्यक्ष सुनील वाघ, कोषाध्यक्ष सुनील लोणकर, सरचिटणीस संदीप जगताप, महिला अध्यक्ष प्रियतमा दसगुडे, सरचिटणीस मधुबाला कोल्हे तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्य व पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारिणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.





