Pune District : तळेघर ग्रामीण रुग्णालय सुरू करा, अन्यथा आंदोलन

तळेघर : तळेघर येथील ग्रामीण रुग्णालय लवकर सुरू करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा किसान सभेच्या वतीने देण्यात आला. तळेघर येथील हे ग्रामीण रुग्णालय त्वरित सुरू न झाल्यास किसान सभेच्या वतीने तळेघर (ता.आंबेगाव) येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाणार आहे.
यासबंधीचे निवेदन किसान सभेच्या वतीने नुकतेच औंध येथभल जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक यांना देण्यात आलेले आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास किसान सभेच्या वतीने तळेघर, ग्रामीण रुग्णालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.
हे आंदोलन मुक्कामी केले जाईल. किसानसभेचे डॉ. अमोल वाघमारे, नंदा मोरमारे,अशोक पेकारी, राजू घोडे, कृष्णा वडेकर,रामदास लोहकरे सुभाष भोकटे,कमल बांबळे, दत्ता गिरंगे,अशोक जोशी यांनी हे निवेदन संघटनेच्या वतीने दिलेले आहे.
किसान सभेच्या वतीने गेली काही वर्षे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सक्षम व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे.





