Pune District : ज्वारी 3500, गहू प्रतिक्विंटल 3500 रुपये

इंदापूर : इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील उपबाजारात भुसार मार्केटमध्ये रविवारी (दि. 2) नविन ज्वारीची आवक सुरू झालेली आहे. ज्वारीला प्रति क्विंटल 3500 तर गहू प्रति क्विंटल 3500 या उच्चांकी दराने विक्री झालेला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती तुषार जाधव यांनी दिली.
शेतकर्यांना इंदापूर-अकलूज रस्त्यालगतच्या बाजार आवारात धान्य सफाई यंत्र सुविधा उभारली असून प्रति तास 5 टन क्षमतेने धान्य सफाई केली जाते. तसेच इंदापूर बाजार समितीने शेतमाल तारण योजनाही सुरू केलेली आहे.
याचा फायदा शेतमाल बांधवांनी घ्यावा. बाजार समितीने मुख्य बाजार इंदापूर मार्केट 60 टन, शिवलिलानगर-इंदापूर अकलूज रस्त्यालगत 80 टन, उपबाजार भिगवण, निमगांव-केतकी व वालचंदनगर येथे 60 टन व क्षमतेचे भुईकाटा (वे-ब्रिज) असून त्यांची 24 तास सेवा उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांनी बाजार समितीचे विविध योजना व उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी केलेले आहे.
यावेळी संचालक माजी आमदार यशवंत माने, विलास माने, दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, संदीप पाटील, रुपाली वाबळे, मंगल झगडे, आबा देवकाते, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे, सचिव संतोष देवकर उपस्थित होते.





