पुणे जिल्हा : सोमनाथ निर्मळ, समीर गारे यांचे युजीसी नेट परीक्षेत यश

मंचर – एसएफआयचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ हे समाजशास्र या विषयातून व पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे यांनी समाजकार्य या विषयातून राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार्या सहायक पात्रता परीक्षा (युजीसी नेट) परीक्षेत यश संपादन केले आहे.
सोमनाथ निर्मळ हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे ‘महाराष्ट्रातील आदिवासींचे उच्च शिक्षण : धोरणे व सहाय्यकारी व्यवस्था’ या विषयवार पीएचडी करत आहेत. यानिमित्ताने ते मागील सहा महिने नार्वे या देशात देखील शिक्षणासाठी जाऊन आले आहेत.
तर पंचाळे खुर्द येथील समीर गारे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(एसएफआय) चे पुणे जिल्हा सहसचिव व आंबेगाव तालुका समिती सचिव म्हणून विद्यार्थी चळवळीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढा देतात.
यासोबतच ते ग्रुप ग्रामपंचायत पांचाळे बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. त्यांनी कर्वे समाजसेवा संस्था, पुणे येथून समाजकार्य विषयातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. हे शिक्षण घेत असताना त्यांनी ‘आंबेगाव तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा सद्यस्थितीचा अभ्यास’ या विषयात संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे.





