पुणे जिल्हा : ‘शिवस्वराज्य यात्रे’चे वाघोलीत उत्साहात स्वागत

वाघोली : शिवस्वराज्य यात्रेचे वाघोलीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. वाघोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कमलाकर सातव पाटील, माजी सरपंच जयश्री सातव पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, शिवसेनेचे नेते राजेंद्र पायगुडे, किसन जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने विधानसभेत आता हवापालट करण्याची वेळ आलीये. महायुतीच्या ढिसाळ कारभाराला वाचा फोडणारी ‘शिवस्वराज्य यात्रा’ निश्चितच परिवर्तन घडवून आणणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी शिरूर हवेली मधील नागरिकांनी आमदार अशोक पवार यांचा देखील सत्कार केला.





