पुणे जिल्हा : शिरूर नगरपरिषदेला लोकसंख्येच्या गटात प्रथम

भूमी थिमॅंटिकमध्येही लख्ख यश : दीड कोटींचे बक्षिस
शिरूर – शिरूर नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान ४.o अंतर्गत २५ ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात राजस्तरावर प्रथम व भूमी भूमीथीमॅटीकमध्येही प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान ४.०” हे शिरूर नगरपरिषदेमध्ये दि. १ एप्रिल २०२३ ते दि. ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविण्यात आले.
माझी वसुंधरा अभियानमध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. अभियाताचा अंतिम निकाल शासनामार्फत (दि.२७) रोजी जाहीर करण्यात आला.
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत राज्यस्तरावरील २५-५० हजार लोकसंख्या गटात शिरूर नगरपरिषदने सर्वोत्तम कामगिरी करून राज्यात प्रथम क्रमांकाचे ४कोटी रुपयांचे पारितोषिक रुपये मिळवले आहे.
त्याचबरोबर भूमीथीमॅटीक मधील उच्चत्तम कामगिरी बद्दल ही राज्यात २५ ते ५० लोकसंख्या असलेल्या गटात प्रथम क्रमांकाचे १ कोटी ५० लक्षाचे पारितोषिक मिळाले. असल्याची माहिती नगरपरिषदेकडून प्राप्त झाली आहे.





