पुणे जिल्हा : अडचणीत धावून नेतृत्व म्हणजे शेरकर

शरद लेंडे : सत्यशील शेरकरांचा बल्लाळवाडीत प्रचार
लेण्याद्री – जुन्नर तालुक्यात पाच धरणे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यामुळेच झाली आहेत. आदीवासी समाजाचे प्रश्न फक्त शरद पवारच सोडवू शकतात. आदीवासी भागात जेव्हाजेव्हा पाणीटंचाई जाणवली, तेव्हा पाण्याच्या टाक्या तसेच अणे-पठार भागावर उन्हाळ्यात जनावरांसाठी चारा श्री विघ्नहर कारखान्याच्या वतीने वेळोवेळी उपलब्ध करून दिला आहे. म्हणून अडचणीच्या काळात मदतीला धावून येणारे युवा नेतृव, महाविकास आघाडीच्या उमेदवार सत्यशील शेरकर हे मोठ्या मताधिक्याने विधानसभेत जातील, असा विश्वास पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांनी व्यक्त केले.
सत्यशील शेरकर यांच्या प्रचारा निमित्त बल्लाळवाडी येथील मतदारांशी संवाद साधताना लेंडे बोलत होते. याप्रसंगी उमेदवार सत्यशील शेरकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले, प्रसन्न डोके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुकाध्यक्ष तुषार थोरात, माजी नगराध्यक्ष सुनिल मेहेर, सुरेखा वेठेकर, अशोक सोनवणे, सरपंच शीतल फोडसे, दिनकर नलावडे, वंदना हुलवळे, ऋषी शिंदे, अजीत सिंहाने, रविंद्र गुंजाळ, गणेश गुंजाळ आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
शरद लेंडे म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात शेतक-यांवर नेहमीच अन्याय झाला असून शेतीच्या कुठल्याही पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. या सरकारने एकीकडे लाडकी बहिण योजना म्हणून 1500 रुपये दिले तर दुसरीकडे लगेच दुसरीकडे महागाई वाढवली आहे. यामुळे शेतकर्यांच्या विरोधातल्या या सरकारला घरी बसवण्याची हिच वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या 30 ते 40 वर्षांपासून श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत आदीवासी भागात जेव्हा पाणीटंचाई निर्माण झाली, तेव्हा पाण्याच्या टाक्या पुरवण्याचे काम केले आहे. भविष्यात या परीसरात पाणी टंचाई कशी दूर होईल याकडे आपण प्राधन्य देणार आहे, तसेच या परिसरातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
– सत्यशील शेरकर, उमेदवार, महाविकास आघाडी
आलमे हे गाव आदिवासी भागात मोडत असल्याने या भागात कायम पाणी टंचाई जाणवत असते. पहिल्या लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासने दिली परंतु कामे केली नाही, त्यामुळे आम्ही यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांनाच मतदान करून आदीवासी समाज हा सत्यशिल शेरकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहे.
– रायबाशेठ घोगरे, आदिवासी नेते





