Pune District : मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय सहाय्यकपदी गणेश किंद्रे यांची निवड

वीसगाव खोरे : रायरी (ता.भोर) येथील गणेश तुकाराम किंद्रे यांनी आर्थिक पस्थितीवर मात करीत जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर मुंबईत मेवा मसाल्याच्या दुकानात काम करणारे तुकाराम किंद्रे यांच्या मुलाने मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण होत रायरी गावच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
त्याचे या यशाचे कौतुक पंचक्रोशीत होते आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या गणेशचे प्राथमिक शिक्षण रायरेश्वर किल्याच्या पायथ्यासी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायरी येथे १ ते १० वी पर्यतचे शिक्षण झाले.
त्यानंतर भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयात ११ वी १२ वी काँमर्स केले.वडील मुंबईत वाशी मार्केटला मेवा मसाल्यात कामाला तर आई गावाला राहून शेती करते. वडील मुंबईला असल्याने तो पुढील शिक्षणासाठी मुंबईत गेला कर्मवीर भाऊराव पाटील माॅर्डन काॅलेज येथे बी काॅमचे शिक्षण पूर्ण केले.
कोणतीही खाजगी शिकवणी न लावता सेल्फ स्टडीवर भर देत नियमित अभ्यास करीत आई-वडील व भावंडांकडून कायमच प्रोत्साहन मिळाले. अधिक परिश्रम घेऊन परीक्षा पासच व्हायचे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवल्याने यश गाठता आले. हे यश मिळविताना अनेक अडचणी आल्या. परंतु कुटुंबाची मिळालेल्या साथीने अडचणीवर मात करणं सहजसुलभ झाले.
– गणेश किंद्रेमाझ्या मुलाने उच्चशिक्षित व्हावे व चांगल्या नोकरीस लागावे, हे आमचे स्वप्न गणेशने मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण होऊन पूर्ण करून दाखविले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्याची जाणीव ठेवत यश संपादन केले.
– तुकाराम किंद्रे, (वडील)शिकत असतानाच तो एमपीएससीचा अभ्यास करत होता.अनेक प्रयत्न केले मात्र, बऱ्याचदा काठावर संधी हुकली. पाच वर्षापासून अभ्यास करत अखेर तो मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण होत आई, वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.





