पुणे जिल्हा : दिंडीतील भेदभाव कमी झाल्याचा सत्याग्रह 50वा करणार

बाबा कांबळे ः 1977मध्ये झाला होता सत्याग्रह
आळंदी – दिंडी सोहळ्यातील जातीय विषमता संपवून समतेचा विचार जोपासणारा लढा उभारण्यात आला होता. त्याला यश आले आहे. संत रोहिदास आजा मेळा चोखामेळा या दलित दिंड्या घोड्याच्या पुढे आणि पालखी सोहळ्याच्या बाहेर चालत होत्या. त्यांना घोड्याच्या पाठीमागे व पालखी सोहळ्यामध्ये प्रवेश मिळावा या मागणीसाठी 1977 साली सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहामुळे दलित दिंड्यांना मुख्य सोहळ्यामध्ये चालण्यास परवानगी मिळाली.
आळंदीत माऊलीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक, वारकरी समतेचे विचार पुढे घेऊन जात आहे. समतेचा हा विचार तळागाळात रुजविण्यासाठी दिंडी सोहळ्यातील भेदभाव कमी करणार्या सत्याग्रहाचा पन्नासावा उत्साहात साजरा करणार असल्याचे प्रतिपादन आळंदी येथील संत रोहिदास मठ व समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळेचे अध्यक्ष हभप बाबा कांबळे यांनी केले.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील संत रोहिदास मठ, हराळे वैष्णव समाज धर्मशाळा वतिने आयोजित वारकरी भूषण समाज भूषण समाजरत्न पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने बाबा कांबळे बोलत होते. यावेळी हभप रामकृष्ण महाराज खाडे यांना वारकरी भूषण पुरस्कार, हभप रोहिदास साधू उगले यांना समाज भूषण पुरस्कार, तसेच सोनाबाई श्रीपती गाडेकर, अंकुश भिकाजी चव्हाण, नामदेव सदाशिव साळुंखे, भालचंद्र कोरेगावकर, खंडूसेठ बनसोडे, विश्वनाथ महादेव शेटे, मारुती बळीबा ढवळे, यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संत रोहिदास मठ व समस्त हराळे वैष्णव धर्मशाळेचे कार्याध्यक्ष अनिल सातपुते, सचिव बाळासाहेब चव्हाण, ज्येष्ठ विश्वस्त कुमार काळे, संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 चे अध्यक्ष हभप सुरेश सोनवणे, पुजारी नारायण गाडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष सुखदेव आबनावे, सुरेखा सुर्वे, विश्वस्त दत्तात्रय शिंदे, नारायण कोकाटे, सिद्धेश्वर सोनवणे, तुषार नेटके, उषा विश्वनाथ नेटके, डॉ. के. टी. कांबळे, लताताई गाडेकर,आदीसह वारकरी, संत रोहिदास मठ व समस्त हराळे वैष्णव धर्मशाळेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सभासद, यावेळी उपस्थित होते.





