प्रभात इफेक्ट : सासवड नगरपरिषद झोपेतून खडबडून जागी

सासवड : सासवड नगरपरिषदेच्या पुतळ्यांवर धुळीचे साम्राज्य या माताळ्याखाली दैनिक प्रभातने शुक्रवारी (दि. 17) वृत्त प्रसिद्ध करताच झोपलेले नगरपरिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले अन् ताबडतोब पुतळे धुण्याचे काम सुरू केल्याने नागरिकांनी प्रभातचे आभार मानले आहेत.
सासवड नगरपरिषदेत अग्निशामक दलाच्या गाडीतून सर्व पुतळे धुऊन स्वच्छ केले आहेत. सासवड नगर परिषदेच्या विविध विकासकामांच्या माध्यमातून आलेल्या निधीमध्ये सासवड शहरातील अनेक चौकांमधून पुतळे उभे करण्यात आले आहेत. या पुतळ्यांच्या कडेला असलेली अतिक्रमणे देखील काढण्याचे काम नगरपालिका प्रशासनाकडून सुरू आहे.
नगरपरिषदेमध्ये असणार्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांच्या समोर व पाठीमागे लावलेले अनधिकृत होर्डिंग नगरपरिषद केव्हा काढणार याकडे देखील सर्व नागरिकांचे लक्ष आहे.
स्वच्छ शहर पुरस्काराचे नक्की हक्कदार होते का?
देशामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत मिळालेल्या पुरस्कारामुळे सासवड नगरपरिषदेचे नाव संपूर्ण देशभरामध्ये गाजले होते; परंतु याच सासवड शहरातील पुतळे धुळखात उभे होते, त्यामुळे सासवड शहर नक्की पुरस्काराचे हक्कदार होत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सासवड (ता. पुरंदर) : नगरपरिषदेत अग्निशामक दलाच्या गाडीतून शहारातील सर्व पुतळे धुऊन स्वच्छ करण्यात आले.





