पुणे जिल्हा : वाळुंजच्या सरपंचपदी रेश्मा चौरे

सासवड : वाळुंज (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेश्मा चौरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कैलास म्हेत्रे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक निर्णय अधिकारी दुर्गादास शेळखंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी रेश्मा चौरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे शेळखंदे यांनी जाहीर केले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य रमेश इंगळे, ग्रामपंचायत उपसरपंच कैलास फ. इगळे, ग्रामपंचायत सदस्य योगिता इंगळे, सुप्रिया इंगळे, निता खोमणे, अनिल इंगळे, तलाठी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विपुल पाटील ग्रामसेविका सोनाली पवार, गोविंद इंगळे, अंकुश इंगळे, लक्ष्मण म्हेत्रे, प्रशांत म्हेत्रे, विकास म्हेत्रे, बापू चौरे, संजय चौरे, सदाशिव चौरे, परशुराम चौरे, अनिकेत नवले, योगेश जगताप, शुभम राऊत, दत्तात्रय म्हेत्रे, प्रकाश इंगळे, चंद्रकांत इंगळे, उपस्थित होते.
गावातील प्रमुख प्रश्न सोडवून गावच्या विकासावर भर देणार असून महिलांसाठी शासकीय योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच रेश्मा चौरे यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच चौरे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.





