पुणे जिल्हा : इंदापुरात उद्या पीडिसी बँकेचे स्थालांतर, शाखेचे नुतनीकरण

आमदार दत्तात्र भरणे यांच्या हस्ते होणार
इंदापूर – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कळस तालुका इंदापूर या शाखेचे स्थलांतर व भिगवण शाखेचे नूतनीकरण रविवारी (दि. 16) सकाळी साडेनऊ वाजता राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव पाटील यांच्या कळस गावामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कित्येक वर्षांपासून जुनी शाखा आहे. या शाखेचा स्थलांतर सोहळा नव्या इमारतीत होत आहे.
तसेच भिगवण शाखा नूतनीकरण झाल्याने भिगवण परिसरातील शेतकरी खातेदार यांना या शाखेच्या माध्यमातून सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्र देसाई यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.





