Pune District : कत्तलीसाठी नेणार्या जनावारांची सुटका
Updated On:

जुन्नर : जुन्नरमधील भरवस्तीचा भाग असलेल्या खलीलपुरा येथे मोकळ्या जागेलगतच्या झाडीमध्ये आठ गायी आणि दोन गोर्हे कत्तली करिता दोरीने बांधून ठेवलेली असताना जुन्नर पोलिसांना मिळून आलेली आहेत.
या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजिद सादिक कुरेशी, अरबाज सादिक कुरेशी, इद्रिस नाजीम बेपारी, अतहार चांद कुरेशी (सर्व रा. खलीलपुरा जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गोरक्षक शिवराज संगनाळे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर , पोलीस अंमलदार लालासाहेब बंडगर करीत आहेत.





