पुणे जिल्हा : ‘जानाई’तील उपोषणकर्त्यांची मिरवणूक

सुपे : सुपे येथे मागील महिन्यापासून जानाई उपसा सिंचन योजनेचा पाणी प्रश्न पेटला होता. उपोषण मागे घेतल्यानंतर उपोषणकर्त्यांची शेतकऱ्यांकडून गावातून मिरवणूक काढण्यात आली.
हक्काचे पाणी मिळताना निर्माण होणाऱ्या अडचणी त्याचबरोबर एकूण १२ मागण्यांच्यासाठी बारामती, पुरंदर व दौड तालुक्यातील जानाई सिंचन योजनेतील लाभधारक शेतकऱ्यांनी उठाव केला होता.
प्रत्येक गावागावांमध्ये आंदोलनाची दिशा ठरवली होती. शेतकरी कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष पोपटराव खैरे, भानुदास बोरकर, सचिन साळुंके यांनी आमरण उपोषण केले.
जानाई सिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या एकूण १२ मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संबंधित अधिकारी व शेतकरी यांची विशेष बैठक घेतली व बैठकीत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. उपोषण मागे घेतल्यानंतर उपोषणकर्त्यांची शेतकऱ्यांकडून गावातून मिरवणूक काढण्यात आली.





