Pune District : दौंडच्या हक्काच्या पाण्यासाठी प्राधान्य देणार

यवत : खडकवासला, पुरंदर जलसिंचन योजना असो यामधून दौंडसाठी मिळणाऱ्या हक्कांचे पाण्यासाठी सर्व ते प्रयत्न प्राधान्याने करण्यात येतील, अशी ग्वाही दौंडचे आमदार राहुल कुल दिली.
बोरीऐंदी येथे बैठकीत ते बोलत होते.
पुरंदर उपसा जलसिंचन योजना अंतर्गत दौंड तालुक्यातील अंदाजे ६५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल, असे आशादायक चित्र आहे. योजनेच्या नकाशात दाखवल्याप्रमाणे आता पाणी मिळत नाही. योजनेअंतर्गत टाकण्यात आलेली पाण्याची पाईप लाईन ही वास्तविक डोंगराच्या पायथ्याजवळून नेणे आवश्यक होते. परंतु ही लाईन चुकीच्या अंतरावरून नेल्याने फार मोठा भूभाग हा पाण्यापासून वंचित ठेवण्यात आला आहे. याबाबत दौंडमधील कार्यकर्ते सातत्याने आवाज उठवित होते. अनेक वर्षांपासून असलेल्या मागणीची आमदार कुल यांना आत्ताशी जाणीव झाली आहे. त्यांनी या योजनेकडे लक्ष दिले आहे. दौंडमधील पुरंदर उपसा जलसिंचन योजनाअंतर्गत दौंडमधील कुपटेवाडी फाटा हक्कांचे पाणी मिळावे. यासाठी आमदार कुल यांनी बोरऐंदी येथील लाभधारक शेतकरी, प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली होती.
यावेळी आमदार राहूुल कुल, पुरंदर उपसा जलसिंचन योजना अधिकारी, लाभधारक शेतकरी, सरपंच, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कुपटेवाडी फाटा कृती समितीचे अध्यक्ष, पत्रकार एम. जी. शेलार यांनी बाजू मांडली. यावर माजी पंचायत समिती सदस्य किसन म्हस्के यांनीही बाजू मांडली. भविष्यातील पाणी प्रश्न समजावून घेवून आमदार कुल यांनी भूमिका मांडली. यावेळी कुल यांनी योजनेच्या अनेक त्रुटी आणि समस्याबाबत समतोल भूमिका विषद केली.
कार्यक्रमास डाळिंब, भरतगाव, बोरीभडक, ताम्हणवाडी, भरतगाव, यवत येथील लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सरपंच राजेंद्र तावरे यांनी प्रास्ताविक तर संदीप गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन म्हेत्रे, भीमा पाटस कारखान्याचे संचालक विकास शेलार, पंचायत समितीचे माजी सदसय किसन म्हस्के, सरपंच बजरंग म्हस्के, भानुदास कुदळे, विलास जगदाळै, सौ. कोळपे, यवतचे सरपंच समीर दोरगे, बाळासाहेब लाटकर, नंदू म्हस्के, प्रकाश टेमगिरे, विलास गव्हाणे, समीर गोठे, तानाजी शेलार, सचिन गायकवाड, जीवन पवार, अंजीर जगदाळे, सविता भोसेकर, योजनेचे अधिकारी उपस्थित होते.





