पुणे जिल्हा : पळसदेवमध्ये आमदार भरणेंचे मतदान घटले

झारीतील शुक्राचार्यामुळे लीड झाले कमी
पळसदेव – पळसदेव तालुका इंदापूर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे गाव म्हणून ओळख आहे. त्यातच राजकीय व सामाजिक दृष्ट्या गावाची वेगळी ओळख आहे.
सध्याच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र कोट्यवधी रुपयाची विकासकामे करून देखील पळसदेवकांनी आमदार भरणे यांना समाधानकारक लीड दिले नसल्याचे चित्र पहायला मिळाल.आमदार भरणे सलग तिसर्यांदा आमदार म्हणून निवडून आले. गेल्या 10 वर्षांत त्यांनी विकासकामे केली यामध्ये एकट्या पळसदेव गावात सुमारे 67 कोटी रुपयांचा निधी रस्ते, समाज मंदिर, गटारी, सभा मंडपसह इतर कामांना दिला; मात्र तरी देखील आमदार भरणे यांना या ठिकाणी प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील यांच्यापेक्षा 43 मते कमी पडलेले पाहायला मिळाला आहे.
यामध्ये घरचा भेदी असल्यामुळे आमदार भरणे यांना मतदान कमी पडल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने मतदानाच्या आदल्या रात्री गुपचूप प्रतिस्पर्ध्यांशी संधान साधून ऐनवेळेस मतदान फिरवण्याच काम केले. आपल्याच पक्षाच्या झारीतील शुक्राचार्यामुळे आमदार भरणे यांना कोट्यवधी रुपयाची कामे करून देखील या ठिकाणी अपेक्षित लीड मिळवता आले नाही यामध्ये आमदार भरणे यांना 1832 तर प्रतिस्पर्धी पाटील यांना 1875 मते मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
पळसदेमध्ये विशेषता काळेवाडीत पाटलांना 534 तर भरणेंना 179, तर बाडेवाडी वॉर्डमध्ये पाटील 241 व भरणे 148 , पळसदेव बुथ क्रमांक 28 मध्ये पाटील यांना 421 तर भरणे यांना 389 मतदान झाला आहे. एकंदरीत विचार करता पाटील यांना भरणे यांच्यापेक्षा 43 मते अधिक मिळाली आहेत. या निवडणुकीत मात्र हर्षवर्धन पाटील गटांन नियोजनबद्ध प्रचार करून राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांच्या संधान साधून साम, दाम याचा वापर करून त्यांना आपल्याकडे वळवून पाटील यांना मतदान देण्यास अनुकूल करून घेतला परिणामी पाटील यांना पळसदेव गावातून अधिकच लीड मिळालेले पाहायला मिळाले.
गटबाजीचा भरणेंना फटका
सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी गटात अंतर्गत कलह वाढत होता. प्रचार दरम्यान देखील गटबाजी थांबले नाही. उलटी अगदी खुलून समोर आल्यामुळे याचा फटका आमदार भरणे यांना बसला अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. आता नेमका हा झारीतील शुक्राचार्य कोण? याचा देखील सध्या शोध सुरू आहे. भविष्यकाळात हे शुक्राचार्य व अंतर्गत कलह न थांबल्यास येणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये याचे परिणाम राष्ट्रवादी पक्षाला भोगावे लागतील हे मात्र नक्की!





