Pune District: पिंपरखेडची प्रांजल बोंबे राज्यात प्रथम
Updated On:

जांबूत : पिंपरखेड (ता.शिरूर) येथील प्रांजल नरेंद्र बोंबे हिने जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत इतिहास विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल तिचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे प्रांजल ही इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. परीक्षेसाठी आपल्या वर्गातून जवळपास २०० विद्यार्थी परीक्षेस बसल्याचे प्रांजल हिने सांगितले. तिला प्राचार्या माधुरी खानदेशे व प्राध्यापक सचिन रोकडे यांचे मार्गदर्शन मिळाले होते.
मार्गदर्शक शिक्षकांबरोबरच मला माझे वडील नरेंद्र बोंबे व आई प्रेरणा बोंबे यांच्याकडूनही योग्य मार्गदर्शन मिळत असल्याचे प्रांजल हिने सांगितले. यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक यांचेसह पिंपरखेड ग्रामस्थांकडून प्रांजलचे अभिनंदन करण्यात येत आहे.





