पिरंगुट : पेरिविंकल शाळेची शैक्षणिक क्षेत्रात दिवसेंदिवस अधिक प्रगती होत आहे. प्रगतीचा चढता आलेख बघता लवकरच पेरीविंकलचे विद्यापीठ होईल, असे प्रतिपादन जगज्जेते शास्त्रज्ञ व परम संगणकाचे जनक, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर यांनी केले. चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेजच्या सूस शाखेचे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय भटकर बोलत होते. मेरी माँ में तेरा लाडला, एकटी एकटी, दमलेल्या बाबाची कहाणी, जंगल जंगल बात चली है, काले मेघा आदी एक से बढ़कर एक गाण्यांवर अत्यंत बहारदार परफॉर्मँसेस सादर करून प्रेक्षक व पाहुण्यांचे अगदी डोळे दीपवणारे आविष्कार सादर केले. यावेळी राज्य महामार्ग पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, दिलीप दगडे, स्वप्नाली सायकर, छाया मारणे, दिलीप मुरकुटे, अजय मारणे, मसाजी काळे, निलेश शेंडे, रमेश ससार, स्नेहा साठे, अविनाश पवळे, माऊली म्हेत्रे, अर्जुन पसाले, वैभव मुरकुटे, योगेश सोनवणे, अध्यक्ष राजेंद्र बांदल, रेखा बांदल, शिवानी बांदल, यशराज बांदल मुख्याध्यापिका निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. पेरिविंकलच्या लहान रोपट्याचे वटवृक्षात्त रूपांतर होत असताना बघून खूप अभिमान वाटतो. सर्व शिक्षक व विद्यार्थी हे कलागुण असलेले आहेत हे सर्वांच्या सादरीकरण याच्यातून दिसून आले, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका नेहा माळवदे, सचिन खोडके कोरिओग्राफर शिवप्रसाद पुजारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ला पाटील यांनी केले.