पुणे जिल्हा : आजी-माजी लोकप्रतिनिधींना जनता कंटाळली

संभाजीराव झेंडे : आंबेगावात रॅलीला प्रतिसाद
कोंढवा – आंबेगावमध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून हा प्रतिसाद अतुलनीय आहे. या जनतेला आजी-माजी आमदार नको आहेत. लोकप्रतिनिधी सध्या नटरिचेबल आहेत. कोणाचेही फोन उचलत नाहीत त्यामुळे जनता त्यांना कंटाळली आहे. त्यामुळे सध्या नको आजी नको माजी आता हवा संभाजी अशा आशयाच्या प्रतिक्रिया सध्या जनतेमधून येत आहेत. त्यामुळे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी केले.
आंबेगाव बुद्रुक (ता. हवेली) येथे झेंडे यांनी पदयात्रा काढून या पदयात्रा, रॅलीसाठी महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. यावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, संतोष फरांदे, अभिजीत कदम, अभय मांढरे, अश्विनी भागवत, डिंपल इंगळे, किरण गोगावले, साहिल मारणे, सुधीर झेंडे, आधी उपस्थित होते.
संभाजी झेंडे म्हणाले की, हवेलीतील 16 गावांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार असून या भागाचे आजी-माजी आमदार यांनी कोणत्याही प्रकारची कामे गेल्या 15 वर्षांमध्ये केले नाही. त्यामुळे या भागाचा विकास होऊ शकला नाही. तर या भागातील मूलभूत प्रश्न सुटले नाहीत ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे त्यांनी सांगितले.
आगामी काळामध्ये माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या माध्यमातून आंबेगाव परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आम्ही करू उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवीत असून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आंबेगाव परिसरामध्ये मिळत आहे.
– युवराज बेलदरे, माजी नरसेवक





