पुणे जिल्हा : बारामती ॲग्रोच्या राखेमुळे पारवडीकर आक्रमक

कारवाई करा : प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे ठराव
बारामती – पारवडी गावाच्या हद्दीलगत शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्यातून मोठ्या प्रमाणात राख उत्सर्जित झाल्याने पारवडी गावात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याने बोलावलेल्या विशेष ग्रामसभेत तरूणांनी आक्रमकपणे भूमिका मांडून राज्य व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे ठराव पाठवून कारवाईची मागणी केली. अनेक वर्षापासून पारवडीकर ग्रामस्थ कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे त्रस्त आहेत.
ग्रामस्थांना गावात वावरताना तसेच वाहन चालवताना कारखान्यातून बाहेर पडणारी हवेत तरंगणारी राख डोळ्यात जाण्यामुळे अनेकांना गंभीर इजा झाली आहे. गावभऱ सर्वत्र राख पसल्याप्रमाणे दृश्य दिसत आहे. लोकवस्तीत घराभोवती घरावर मोठ्या प्रमाणात हवेत उडत येणार राख पडल्याने धूऊन वाळत टाकलेले कपड्यांवर पडत आहेत. त्यामुळे किती कपडे धुतले तरी ते काळेकुट्ट होत आहेत. स्वच्छ कपडे घालून घराबाहेर पडलेला व्यक्तीचे पाच मिनिटाच्या आत कपडे राख पडल्याने काळे होत आहेत. परिणामी कपडे धुण्याचा वारंवार खर्च वाढल्याने ग्रामस्थांना खर्च ही वाढला आहे.
प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली
पारवडी गावात प्रामुख्याने शेती व्यवसाय असून प्रामुख्याने ऊस पिकांबरोबर, फळे, फळभाज्या, पालेभाज्या आदीची शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. कारखान्यातून बाहेर पडण्याऱ्या राखेमुळे शेतातील या पिकांवर परिणाम होत आहे. पिकांच्या पानांवर मोठ्या प्रमाणात राख साठून राहिल्याने प्रकाश संश्लेषनाची क्रिया घडत नाही. त्यामुळे पिकांची वाढ नीट होत नसल्याने शेतीउत्पादन घटत आहे. पीक निरनिराळ्या रोगाला बळी पडत आहेत. शेतीपूरक व्यवसाय असणाऱ्या दुधव्यवसायास देखील फटका बसत आहे.
तंबी नको, कारवाई करा
पारवडी गावात चाऱ्यातून राख जनावरांच्या पोटात जात आहे. त्यामुळे गायी- म्हशींच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी दूध उत्पादनावर घटले आहे. सरपंच मयुरी गावडे यांनी ग्रामस्थांचे वायू प्रदुषणाच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच साखऱ काऱखान्याच्या पदाधिकारी अधिकारी यांनी तंबी देण्याच्या मुद्द्यावर मात्र तरूणांनी आक्षेप नोंदवून कारखान्यावर कारवाईची मागणी केली आहे.





