Pune District : पाणंद, शिवरस्त्याने घेतला मोकळा श्वास

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव व गलांडवाडी नं. दोन मधील 800 मीटरचा शिवरस्ता व मौजे वडापुरी येथील संजय डोंगरेवस्ती ते सुरवड भांडगाव रस्ता हा एक किलोमीटर लांबीचा पाणंद रस्ता इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्याम झोडगे यांच्या हस्ते नागरिकांच्या सर्व संमतीने खुले करण्यात आले.
तालुक्यातील गावागावात असे वाद विकोपाला गेले. यापायी अनेकदा तक्रारी झाल्या; मात्र जागच्या जागी वाद मिटवणारा अधिकारी इंदापूर तालुक्याला मिळत नव्हता. सध्याचे तहसीलदार जीवन बनसोडे व मंडल अधिकारी श्याम झोडगे हे यावर यशस्वी मार्ग काढत आहेत.
त्यामुळे वर्षानुवर्षे चाललेले वाद मिटण्यांस मोठी मदत होत आहे. म्हणून तहसील जीवन बनसोडे यांचे शेतकरी व नागरिकांनी आभार मानले आहेत. याप्रसंगी इंदापूरचे ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, वडापुरीचे भागवत तिकुटे व अवसरीचे भूषण सुरवडकर व दोन्ही गावातील नागरिक उपस्थित होते.





