पुणे जिल्हा : पाण्याअभावी फळबागा जळाल्या

पुरंदरच्या बागाती भागातील स्थिती : पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण
गराडे : पुरंदर हा तसा दुष्कळग्रस्त तालुका म्हणूनच ओळखला जातो. गेल्या वर्षी अत्यंत अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळाच्या झळा या तीव्र झाल्या असून वाड्यावस्त्यांच्या रस्त्यांवर जास्त करून टँकरचीच वर्दळ दिसून येत आहे. येथे नागरिकांनाच पिण्यासाठीच पाणी नसल्याने बागाच्या बागा डोळ्यादेखत जळून जाताना पाहण्या खेरीज बळीराजापुढे कोणताही मार्ग नाही.
पुरंदर तालुक्याला शासनाने दुष्काळी तालुका जाहीर केला आहे. तर या दुष्काळाच्या झळा या तालुक्यातील शेतकरी नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुष्काळी सामना करावा लागत असून त्याचप्रमाणे शेतातील फळबगा काही ठिकाणी सुकल्या तर काही ठिकाणी पाण्यामुळे जळून गेल्या आहेत.
ज्या शेतक-यांनी अनेक वर्षांनूवर्षे तळहाताच्या फोडाप्रमाणे झाडे सांभाळी त्या झाडांना या भयानक दुष्काळात सांभाळणे अवघड झाल्याने व जमिनीतील पाणीसाठा खोल गेल्यामुळे फळबागा सुकून गेल्या आहेत; परंतु चांबळीतील संजय कामथे यांच्या शेतातील नारळ व आंब्यांची अनेक झाडे पाण्याविना जळाले आहेत, त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. यात अनेक हे नारळ झाडे असोन 10 ते 12 आंब्यांची झाडे आहेत.
फळबागा वाचविण्यासाठी कसरत
पुरंदर तालुक्यातील पश्चिम भाग हा सधन असा समजला जातो. तर या भागातील बागायती पट्टा असलेला चांबळी या गावातील उत्तर भागात असलेल्या डोंगरी भागात सध्या पाण्याची पातळी खालवलेली असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी, लागत आहे. तर शेतातील फळबागा वाचवणे यासाठी कसरतच करावी लागते.
यावर्षी भयानक दुष्काळ असल्याने पाण्याची पातळी फार खालवलेली आह. त्यात ज्य भागात झाडे लावली आहेत तो भाग खडकाळ असल्याने पाणी देऊनही उपयोग नाही कारण आजपर्येंत पाण्याचो पातळी बर्यापैकी होती तेव्हा टँकरने पाणी दिले तरी झाडे जगत होती; परंतु यंदा टँकरने पाणी दिले तरी ऊन एवढे आहे की या पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने झाडे जळताना पाहण्याशिवाय काहीही पर्याय नाही.
– संजय कामथेे, शेतकरी, चांबळी





