Pune District : मंचर बाजार समितीत कांद्याचे भाव स्थिर
Updated On:

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत. शेतीच्या कामामुळे आवक घटली आहे. मंगळवार, दि.३ रोजी चांगल्या प्रतीच्या कांद्याला दहा किलोला १५५ रुपये असा बाजारभाव मिळाला.एकूण ६४७७ कांदा पिशवीची आवक झाली, अशी माहिती मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली.
मंचर बाजार समितीत कांद्याचे प्रति दहा किलोचे दर पुढीलप्रमाणे सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा १४५ ते १५५ रुपये,सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये १३० ते १४५ रुपये, सुपर मिडीयम २ नंबर कांद्यास ११० ते १३०रुपये, गोल्टी कांद्यास ७० ते १०० रुपये, बदला कांदा व चिंगळी कांद्यास २० ते ८० रुपये असा बाजारभाव मिळाल्याचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.





