Pune District : मंचर बाजार समितीत कांद्याला १० किलोला २०० रुपये भाव

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १० किलोला २०० रुपये, असा बाजारभाव मिळाला. १२५८९ हजार पिशवी कांद्याची आवक होवून चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला २०० रुपये या भावाने रविवार, दि. १६ रोजी विकला गेला आहे. कांदा बाजार भावामध्ये किंचितशी वाढ झाल्याची माहिती सभापती निलेश थोरात यांनी दिली.
मंचर बाजार समितीत शेतकरी शेतात काढलेला कांदा लगेच विक्रीसाठी आणत आहेत. कांद्याचे प्रति दहा किलोचे दर पुढीलप्रमाणे:सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा १८० ते २०० रुपये, सुपर गोळे कांदे १ नंबर १५० ते १८० रुपये, सुपर मिडीयम २ नंबर कांद्यास १२० ते १५० रुपये, गोल्टी कांद्यास १०० ते १२० रुपये, बदला कांद्यास ५० ते १०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
मंगळवार दि.११ रोजी चागल्या प्रतीच्या कांद्याला १० किलोसाठी १६० ते १८० रुपये बाजार भाव होता.यावेळी १० किलोसाठी कांदा १८० ते २०० रुपये बाजारभाव मिळाला.कांद्याच्या बाजारभावात यापुढील काळात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





