Pune District : वर्षाची नव्हे; पूर्ण टर्मची चौकशी करा

इंदापूर : त्या मुलांचे वडील कधीही येणार नाहीत, त्यांचा खून झाला आहे. मुलगी, पत्नी न्याय मिळण्यासाठी वणवण फिरत आहेत. मुलीच्या, भावाच्या, बायकोच्या डोळ्यातील अश्रू हे राज्य सरकारला दिसत नाही. किती अस्वस्थ करणारी ही परिस्थिती आहे.खून झालेला पाचवा माणूस कुठे आहे. गायब फोनचे सीडीआर मिळू शकत नाहीत, असे कसे होऊ शकते.
शेतकर्यांची फसवणूक, डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये एकच वर्षाची चौकशी करा, अशी मागणी आहे; मात्र मी स्वतः बीडला जाऊन मागणी करणार आहे पूर्ण टर्मची चौकशी करा .पूर्ण पाच वर्षाचा हिसाब किताब तपासणार अशी ग्वाही बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
इंदापूर येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद कृषी महोत्सवास भेट देऊन पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर, अमोल भिसे, अमोल मुळे, यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी कधीही इतके असंवेदनशील राज्य सरकार पाहिले नाही. नैतिकतेची भेट झाली नाही. सुरेश धस हा डायलॉग सर्व चॅनलवर बोलले आहेत. या सुरेश भाऊंकडून मला खूप अपेक्षा होत्या. राजकारण बाजूला ठेवून त्या मुलांसाठी, पोरांसाठी उभे होते. देशमुख कुटुंबाची काय चूक असे म्हणत बीड परभणी प्रकरणाची हळहळ खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
जल जीवन मिशनचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा पूर्णपणे संबंधित मंत्र्यांकडे श्वेत पत्रिका मागितली आहे. खासदार निलेश लंके यांनी पूर्ण राज्याची श्वेतपत्रिका मागितलेली आहे.जनतेने टॅक्स भरलेल्या रक्कम यातूनच हा निधी मिळतो. जल जीवन मिशनचे काम ग्राउंडवर चांगले कोठेही दिसत नाही. देशात 41 टक्के निधी या योजनेला खर्च झाला नाही. सी. आर. पाटील यांनी जलजीवन मिशनचा एकही पैसा वाया जाणार नाही, असा मला शब्द दिला आहे.
-सुप्रिया सुळे, खासदार बारामती





