Pune District : माळेगाव कारखान्यात मिल रोलर पूजन

माळेगाव – माळेगाव कारखान्याचा २०२५-२०२६ साठीचा हंगाम सुरु करण्याचे दृष्टीने कारखान्याचे इंजिनिअरींग विभागाकडील मिल रोलरचे पूजन कार्यक्रम गुरुवार (दि.३) पार पडला.
चेअरमन केशवराव जगताप, व्हाईस चेअरमन राजेंद्र ढवाण व नवनिर्वाचित संचालक अविनाश देवकाते यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी मील रोलर तयार ठेवणेत आले होते. याप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, आजी- माजी संचालक मंडळ, कार्यकारी संचालक अशोक पाटील, वर्क्स मॅनेजर अनिल वाबळे,
सर्व विभाग प्रमुख, कामगार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याचा गळीत हंगाम वेळेत सुरु करण्याचे दृष्टीने सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या कामाचा आढावा घेतला असून कामाची तयारी सुरू आहे. सर्व कामांची वेळेत पूर्तता करण्याबाबत चेअरमन व संचालक मंडळ यांनी सूचना केल्या आहेत.
कारखान्याचे चेअरमन केशवराव सर्जेराव जगताप म्हणाले की, या हंगामासाठी १५.०० लाख टनाचे गाळपाचे उदिष्ट असल्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने आवश्यक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे तसेच केन हार्वेस्टर करार करण्यात येत आहेत.





