माऊली कटके यांचा दणदणीत विजय : अशोक पवार यांचा धक्कादायक पराभव शिरूर – शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांचा ७४ हजार ५५० हजार मतांनी पराभव करून शिरूर हवेलीच्या गडावर आपले नाव कोरले. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली असल्याचे दिसून आले आहे. शिरूर- हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या नावाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहायक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. आमदार निवडीचे सर्टिफिकेटही निवडणूक अधिकारी संगीता राजापूरकर यांनी त्यांना दिले आहे. विजयानंतर शिरूर शहर वाघोली या गावांमध्ये व निवडणूक मतमोजणीच्या केंद्राबाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष, गुलालाची उधळण तर फटाक्याची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांची विकासकामे उत्तर ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांची उज्जैन यात्रा, गुलबर्गा यात्रा, लाडकी बहिणींनी दिलेली साथ, निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी झालेले योग्य नियोजन तर शिरूर तालुक्यात कामधेनू असलेली घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा या निवडणुकीत बनला होता. त्याचा फटका यामुळे माऊली कटके यांनी एकतर्फी विजय मिळवता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माऊली कटके यांची उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी शिरूर येथे झालेली भव्य सभा या सभेची चर्चा व हवा संपूर्ण शिरूर हवेलीमध्ये झाली. ती शेवटपर्यंत कायम राहिली. यावर ही निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजत असताना लाडक्या बहिणीने ही यामध्ये लक्ष घातल्याचे दिसून आले आहे. शिरूर तालुक्यातून अशोक पवार व ज्ञानेश्वर माऊली कटके या दोघांमध्ये माऊली कटके यांनी ३० हजारांहून जास्त मतांची आघाडी घेतली हीच आघाडी अशोक पवार यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब करून गेली. एकूण पोस्टल मतदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार यांना 680 मते तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांना 639 मध्ये पडली. यामध्ये मात्र अशोक पवार यांनी आघाडी घेतली. निवडणुकीमध्ये पोस्टल मतदानामध्ये झालेल्या मतदानात सरकारी कर्मचारी यांनीही नऊ नोटा मतदान करून दोन्ही प्रमुख उमेदवार व इतर नऊ उमेदवारांना नाकारून नोटाकडे आपले मत दिले आहे. शिरूर मतदारसंघाचे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कटके यांना १ लाख ९२ हजार २८१ इतकी मते मिळाली तर त्यांची प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवार अशोक पवार यांना १ लाख १७ हजार ३१ इतकी मते मिळाली. सैनिक समाज पक्षाचे तुकाराम डफळ ३१५२ मते मत मिळाली आहे. २१५७ नोटाला इतकी मते मिळाली आहेत. त्यामुळे कटके यांनी आमदार पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव करून त्यांना चित केले. घोडगंगा, अनेक नेत्यांचा विरोध निवडणूक मतमोजणीदरम्यान मतमोजणी प्रतिनिधी यांनी दहावेळा मतमोजणीत ऑब्जेक्शन घेतल्यामुळे मतमोजणी विलंब झाला. शिरूर- हवेली तालुक्यातील आमदार पवार यांना होणारा राजकीय नेत्यांचा मोठा विरोध व जवळचे अनेक नेते विरोधात गेल्याने व घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद याचा झालेला तोटा या सर्वांच्या चक्रव्यूहात अडकून आमदाराचे पवार यांचा गेम होऊन त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अतिशय अटीतटीची उभा पहिल्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात काटे की टक्कर अशी झाली. निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर तर्क वितर्क व पैजा यांनी शिरूर हवेलीचे वातावरण ढवळून निघाले होते.