Pune District : प्रभातच्या दणक्याने महावितरण खडबडून जागे

चाकणमध्ये डीपीभोवती वाढलेली झाडे, झुडपं वेली काढल्या
चाकण – चाकणमध्ये महावितरणची बेफिकीरी? या मथळ्याखाली दैनिक प्रभातने वृत्तप्रसिद्ध करताच झोपलेले महावितरण विभाग खडबडून जागे झाले आणि महावितरणने डीपी परिसरातील वाढलेली झाडे, झुडपं वेली काढल्या असल्याने नागरिकांनी प्रभातचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाने (महावितरण) डीपी (विद्युत वितरण पेटी)च्या परिसरात वाढलेल्या वेली, झुडपे व उघड्या अवस्थेतील वायरिंगमुळे अपघाताची शक्यता याची त्वरित दखल घेत कार्यवाही सुरू केली आहे. संबंधित विभागाने परिसराची पाहणी करून वाढलेल्या वेली हटविण्याचे आणि उघड्या वायरिंगचे दुरुस्ती व सुरक्षितपणे संरक्षक आवरण लावण्याचे काम तातडीने सुरू केले आहे.
विशेष म्हणजे, महावितरणच्या अधिकार्यांनी तांत्रिक कर्मचार्यांसह घटनास्थळी भेट देत स्थानिक नागरिकांची माहिती घेतली आणि त्यांच्या सहकार्याने ही कार्यवाही सुरू केली. महावितरणकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी अशा धोकादायक डीपी किंवा वायरिंगची माहिती तात्काळ कार्यालयात द्यावी, जेणेकरून वेळेत उपाययोजना करता येईल
आणि कोणताही अपघात होणार नाही याची वरदरी घेता येईल येईल. असे वीज वितरण कंपनी कडून सांगण्यात आले. महावितरणने तातडीने डीपी, झाडझूडपे, वेली मुक्त केल्यामुळे नागरिकांनी महावितरण आणि प्रभातचे आभार मानले.





