सासवड – महिलांच्या खऱ्या अर्थाने जगामध्ये शिक्षणाची क्रांती आणि महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण आणि त्याच्या माध्यमातून परिवाराला सक्षम करणे हा संदेश जगभरामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने रुजवला. पुरंदरच्या मातीमध्ये अनेक राष्ट्र पुरुषांचा जन्म झाला. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षणाचे खूप मोठे कार्य ज्यांनी जगभरामध्ये दिशा देण्याची काम अठराव्या शतकामध्ये केले. ते क्रांतीज्योती महात्मा फुले यांचे कार्य आणि कर्तृत्व जगभर पसरले आहे. असे प्रतिपादन माजी आमदार संजय जगताप यांनी केले. खानवडी (ता. पुरंदर) येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची १३४ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत व महात्मा फुले स्मारक समिती यांच्या वतीने महात्मा फुले जयंतीचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुदाम इंगळे होते. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी ची तरतूद करण्यात आली आहे. नवीन पिढीला महात्मा फुले, महात्मा गांधी, शाहू महाराज, शिवछत्रपती, डॉ बाबासाहेब आंबेडकर, समजले पाहिजे, यासाठी शासनाने उपक्रम सुरू ठेवले पाहिजेत. या परिसराचा विकास कोणत्या दृष्टीने करता येईल याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते यांनी मार्गदर्शन केले. माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या वारसामुळे पुरंदर तालुक्यातील कुंजीर कुटुंबातील एक मुलगी लेफ्टनंट कर्नल या पदापर्यंत पोहोचू शकली, अशा अनेक मुली सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या धोरणामुळे समाजात उज्वल यश प्राप्त करीत आहेत. क्रांतीज्योती इंटरनॅशनल स्कूलच्या उभारणीमध्ये अजित पवार यांनी दहा कोटी रुपये दिले आहे. ही शाळा जूनपर्यंत सुरू होत आहे ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊ व मार्ग काढू. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप यादव, निलेश जगताप, सरपंच स्वप्नाली होले, रवींद्र फुले, सतीश कुमदाळे, संदीप चंद्रकांत टिळेकर, सुनील कुंजीर, रवींद्र फुले, विजय होले, उषाताई धिवार, योगेश रासकर, कल्पना होले, सचिन होले, अनंता जाधव, विठ्ठल गुरव, माजी सरपंच श्यामकुमार मेमाने, शिवदास धुमाळ, हरीभाऊ लोळे, मीरा कुंजीर, प्रवीण कुदळे, रमेश बोरावके, प्रताप मेमाणे, संदीप टिळेकर, उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन बाळासाहेब फडतरे यांनी केले. धनंजय जगताप यांनी आभार मानले. खानवडीतील स्कूलमध्ये स्थानिकांना प्रवेश द्या बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार म्हणाले की, खानवडी येथे क्रांतीज्योती इंटरनॅशनल स्कूल ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालवली जाते. शाळेचे नाव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असे ठेवण्यात यावे, गावच्या वतीने या ठिकाणी जागा देताना स्थानिक मुलांसाठी आरक्षण ठेवले जाईल, असे सांगितले होते. परंतु या शाळेमध्ये स्थानिकांना येण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे भविष्यात आरक्षण न ठेवल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.