पुणे जिल्हा : महाराष्ट्र प्रदूषण बोर्डच सर्वाधिक प्रदूषित – सुरेश भोर

रांजणगाव गणपती (प्रतिनिधी): “महाराष्ट्र प्रदूषण बोर्डच सर्वाधिक प्रदूषित आहे, त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे परिसरात रोगराई वाढली असल्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबधीत कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुरेश भोर यांनी केली आहे. कंपनीने शासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केले नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
परिसरातील ग्रामस्थांनी कंपनी विरोधात आंदोलन केले होते . त्यावेळी शिवसेना उद्धव गटाचे तालुका प्रमुख भोलेनाथ पडवळ यांनी या आंदोलनाच्या केसेस मोफत लढणार असल्याचे सांगितले. प्रशासन निवेदनाला कराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेखर पाचुंदकर यांनी दिला आहे. यावेळी सुरेश भोर, शेखर पाचुंदकर राहुल पाचर्णे, यशवंत पाचंगे, शशिकांत दसगुडे, आबासाहेब सरोदे, विक्रम पाचुंदकर, विठ्ठल पवार, ऍड भोलेनाथ पडवळ, गणेश सरोदे, संतोष शिंदे, उज्वला अंकुश इचके, उत्तम व्यवहारे, लक्ष्मण सांबारे,सचिन सांबारे,
सोन्याबापू दसगुडे, प्रकाश थोरात, संजय शिंदे, गणेश कर्डीले, संतोष कर्डीले, अरुण घावटे, राणी कर्डीले, विठ्ठल घावटे, मंडलाधिकारी स्वाती टाव्हरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, महादेव वाघमोडे यांसह शासनाचे विविध विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे ग्रामस्तानी सांगितले.
पुणे-नगर महामार्गावर करण्यात आलेले आंदोलन अतिशय शांततेने पार पडले. दरम्यान, पुढील आंदोलन हे थेट कंपनीच्या गेटवरच ५ ऑक्टोबर रोजी करण्यात येईल असा इशारा निमगाव भोगी येथील ग्रामस्थांनी दिला आहे. या पंधरा दिवसात प्रशासनाने जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो घ्यावा तसेच सदर कंपनी बंद करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे. ‘एम ई पी एल हटाव गाव बचाव’ या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता.





