पुणे जिल्हा : कायद्याचा वापर ढाल म्हणून केला पाहिजे

न्यायाधीश शीतल साळुंखे डाळज येथे कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन
पळसदेव – उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाने न्यायाधीश व वकील यांनी गावोगावी जाऊन कायद्याचे महत्त्व पटवून देत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कायद्याबद्दलची पूर्णतः माहिती होणे हा यामागचा उद्देश आहे त्याप्रमाणे सर्वसामान्यांनी कायद्याचा वापर तलवार म्हणून न करता ढाल म्हणून करावा तसेच आपापसातील मतभेद सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचू शकतो त्यामुळे नागरिकांनी कायद्याबाबत जागरूक राहावे, असे मत न्यायाधीश शीतल साळुंखे यांनी डाळज येथे बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये व इंदापूर विधी सेवा समिती अणि इंदापूर वकील संघटना यांचे संयुक्त विद्यमाने गाव मौजे डाळज नंबर 2 या ठिकाणी कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरप्रसंगी इंदापूर न्यायालयाचे न्यायाधीश के. सी. कलाल यांचे उपस्थितीत व न्यायाधीश शीतल साळुंखे यांचे अध्यक्षतेखाली सदरचे शिबिर पार पडले.
यावेळी इंदापूर न्यायालयाचे न्यायाधीश जे. बी. खटावकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार व कायदे विषयावर मार्गदर्शन केले. ऍड. सचिन चौधरी यांनी महिलाविषयक कायदे व ऍड. ज्योती जगताप यांनी चलनक्षम दस्तऐवज या विषयावरती मार्गदर्शन केले. या वेळी इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. माधव शितोळे, सरपंच शकुंतला जगताप, सरपंच अमित जाधव, अरविंद जगताप, इंदापूर वकील संघटनेचे ज्येष्ठ सदस्य ऍड. के. डी. यादव, ऍड. बी. आर. चव्हाण,
उपाध्यक्ष ऍड. धैर्यशील नलवडे, सचिव ऍड. आसिफ बागवान, ऍड. पांडुरंग जगताप, ऍड. देवानंद सांगळे, ऍड. सुभाष भोंग, ऍड. संजोत शिंदे, ऍड. सिद्धनाथ लोहकरे, ऍड. सुधीर वाकळे यांसह इतर सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. माधव शितोळे यांनी केले, सूत्रसंचालन ऍड. आसिफ बागवान तर उपाध्यक्ष ऍड. धैर्यशील नलवडे यांनी आभार मानले केले.





