Pune District : मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पुरंदरच्या शिक्षण विभागाकडून कोलदांडा

सासवड : शासकीय कार्यालयातील कामकाज अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शक होऊन जनतेच्या तक्रारींचे निराकरण तत्परतेने व्हावे. शासकीय योज हेनांचा प्रचार व प्रसिद्धी गाव पातळीपर्यंत व्हावी. या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना 100 दिवसांकरीता कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष भर दिला असल्याचे परिपत्रकात नमूद आहे; मात्र पुरंदर तालुक्यातील गटशिक्षणाधिकार्यांच्या दारात कचराकुंडी झाली असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मात्र हरताळ फासला असल्याचे पहावयास मिळते.
सासवड (ता पुरंदर) येथील जुन्या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये असणारा पुरंदर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे शिक्षणाधिकारी यांचे झाले असून या कार्यालयासमोर झाडाचा पालापाचोळा पडलेला असल्याने अधिकारी, कर्मचारी, येणारे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. विविध यंत्रणेमार्फत करण्यात येणारी विकास कामे व योजना अंमलबजावणी अंमलबजावणी गुणवत्तापूर्वक व प्रभावीपणे होण्यासाठी 5 जानेवारी ते 15 एप्रिल अखेर 100 दिवस कृती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाच्या स्पष्ट सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी 13 जानेवारी रोजीच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्वच खाते प्रमुखांना दिले होते. मात्र या आदेशाकडे पुरंदरच्या शिक्षण विभागाने अक्षम्य दुर्लक्ष व कुचराई केल्याचे समोर आले आहे.
100 दिवस कृती कार्यक्रम अंमलबजावणीमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदे अंतर्गत येणारी सर्व कार्यालये स्वच्छ सुंदर व निटनेटके असावीत. तेथील वातावरण सुलभ, प्रेरक व असावे या करिता सुंदर माझे कार्यालया अंतर्गत स्वच्छता अभियान अंमलबजावणी करताना कार्यालयीन स्वच्छतेसह इमारत व परिसरातील नियमित स्वच्छता राहिल याबाबत दक्षता घेण्यास सांगितले आहे; मात्र, पुरंदर पंचायत समितीच्या अंतर्गत येणार्या शिक्षण विभागामध्ये परिसर स्वच्छतेला महत्त्व दिलेले नाही. कार्यालयाच्या समोरचा व आजुबाजुचा परिसरातील नियमित स्वच्छता केली गेली नसल्याने शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
ठळक बाबी
कार्यालयीन उपस्थिती व फिरतीचे वार याबाबत दर्शनी भागात फलक लावलेले नाहीत
कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही
महिला अभ्यासकतांसाठी कार्यालयात स्वतंत्र हिरकणी कक्ष नाही
कार्यालयामध्ये दिशादर्शक फलक व माहिती फलक उपलब्ध नाहीत
कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्या नावाची पाटी त्यांच्या बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आली नाही
शैक्षणिक योजनांचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत अधिक गुणवत्तापूर्वक व प्रभावीपणे पोहोचवण्याकरता कनेक्टिव्हिटी यंत्रणा सक्षम करण्यात आलेली नाही
गतिमान प्रशासन हा हेतू साध्य करण्यासाठी एवन तसेच ब्लॉक चेन अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला नाही
आठवड्यातून एक दिवस बांधकाम विभागाचे मैलकोल्ही हे परिसर स्वच्छ करून देत असतात पंचायत समितीच्या नवीन इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे; परंतु जुन्या इमारतीमध्ये पाण्याची सोय नाही. तर हे हीरकणीकक्ष हा पंचायत समितीच्या नवीन इमारतीमध्ये आहे. माझ्याकडे बारामती नगरपरिषदेचा अतिरिक्त कारभार आहे. दर्शनी भागात भागामध्ये फिरतीचे बोर्ड लवकरच लावला जातील. योजनांचे बोर्ड बाहेर लावलेले आहेत.
– संजय जाधव, गटशिक्षणाधिकारी, पुरंदर





