Pune District : खेड तालुका पुन्हा हादरला; दहा वर्षीय मुलीवर 55 वर्षीय नराधमाकउून अत्याचार

राजगुरुनगर : खेड तालुक्यात एकामागून एक लहान मुलींवर अत्याचार करण्याच्या घटनांनी हादरून निघत आहे. राजगुरूनगर शहरानजीक एका गावात 10 वर्षीय मुलीवर 55 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी नराधम ज्ञानेश्वर उर्फ माऊलीबाबा नामदेव भोसले (वय 55, रा. वडगाव पाटोळे, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. खेड पोलिसांनी माहितीनुसार, मंगळवारह (20 मे) दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पिडित मुलीचे वडील बाहेर गेले होते.
ती घरात एकटीच होती. यावेळी नराधम झानेश्वर उर्फ माऊलीबाबा नामदेव भोसले याने घरात जाऊन चिमुकलीवर झालेला प्रकार कोणालाही सांगितला तुला मारुन टाकील अशी धमकी दिली. त्याच दिवशी संध्याकाळी मुलीचे पोट दुखू लागल्यानंतर हा प्रकार मुलीने तिच्या नातेवाईकांना सांगितला.
त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. पीडित निर्भयासह नातेवाईकांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तुयाच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.




