पुणे जिल्हा : क-हेकाठी भक्तीचा मेळा फुलाला

दोन दिवसांचा मुक्कामानंतर माऊलींचे आज जेजुरीत विसावाणार
लाखो भाविकांनी घेतले माऊलींंचे दर्शन
सासवड : पुण्याचा दोन दिवसीय मुक्काम आपटून माऊलींची पालखी अवघड दिवे घाट सर करीत मंगळवारी (दि. 2) संत सोपानकाकांच्या नगरित अर्थात सासवडमध्ये विसावली. बुधवारी (दि. 3) माऊलींचा मुक्काम हा सासवड (क-हेकाठी) नगरितच होता त्यामुळे कर्हेकाठी भक्तीचा मेळा जमला होता. गुरुवारी (दि. 4) सकाळी 7 वाजता जेजुरीकडे पालखी प्रस्थान ठेवणार आहे.
साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसर्याप्रमाणे सासवड शहरात या पालखीचे अतिशय उत्साहात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत होताना पाहायला मिळतय. तर या वारीत चालवणार्या लाखो वारकर्यांच्या सेवेसाठी हजारो हात राबत आहेत. तर एका दिवसात तब्बल 28 किलोमीटरचा अंतर चालून आलेले थकले भागलेले वारकरी याच सासवड मुक्कामी थांबत आसतात.
परंपरेनुसार चालत आलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या भेटीनंतर बुधवारी दुपारी 11 वाजता सासवड येथून संत सोपानदेवांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. यासाठी देवस्थानच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली असून आज दुपारी सोपानदेव विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गामध्ये अनेक पालखी तळ हे आता शहरामध्ये किंवा गजबजलेल्या वस्तीमध्ये अल्याने अनेकवेळा भक्तांबरोबरच बर्याच वारकर्यांची ही अडचण होत आहे.
या पालखी मार्गातील सर्वात सुसज्ज आणि विस्तीर्ण असा पालखी तळ सासवडमध्ये आहे. या पालखी तळाला चोहु बजावून कंपाउंड बनवण्यात आल्याने कितीही गर्दी झाली तरीही त्यावर नियंत्रण ठेवणे हे प्रशासनाला शक्य होत आहे. सासवड शहरातील म्हाडा वसाहतीची कमाल ते पालखीतळ व संपूर्ण पालखी तळाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सासवड मुक्कामी येणारे वारकरी हे सोपान काकांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत होते. माऊलींची पालखी सासवड मुक्कामी आल्यानंतरच सोपान काकाची पालखी ही पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवत असते. येथून पुढे वेगवेगळ्या मार्गाने जाणारे हे भावंडे पुढे पंढरपूरला एकत्र येतात.





