पुणे जिल्हा : अविरत काम करण्यास जेजुरीकर ऊर्जा देतात

संभाजीराव झेंडे : खंडेरायाच्यानगरित पदयात्रेला प्रतिसाद
जेजुरी – जेजुरी गावाशी माझे जुने ऋणानुबंध आहेत. इथल्या स्थानिक नागरिकांकडून मिळणारे प्रेम आणि विश्वास कायम अविरत काम करण्यासाठी मला नेहमी ऊर्जा देत राहते अशी भावना पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजी झेंडे यांनी व्यक्त केली.
संभाजीराव झेंडे यांच्या प्रचारार्थ जेजुरीमध्ये रविवारी (दि. 17) पदयात्रा आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला आणि युवक-युवती मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक सचिव आणि माजी नगराध्यक्षा अमृता घोणे, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, सामाजिक कार्यकर्ते दशरथ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष लता दोडके,
पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रीती जगताप, वंदना जगताप, नलिनी कामठे, पुणे सेवा दल अध्यक्ष परवीन पानसरे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी कुलकर्णी, जेजुरी देवस्थान माजी अध्यक्ष संदीप घोणे, राष्ट्रवादी काँग्रेस जेजुरी शहर अध्यक्ष रमेश लेंढे, सुयोग राऊत, प्रकाश माळवतकर पाटील, सागर काळे, सतीश शिंदे, महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जेजुरीचे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रा. डॉ. दुर्गाडे म्हणाले की, प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आणि नेहमी जमिनीवर पाय असणार्या झेंडे यांच्या रुपाने आपल्या मतदारसंघाला अभ्यासू आणि कर्तृत्ववान नेतृत्व लाभलं आहे. भावी काळात पुण्याची मेट्रो सासवड पर्यंत आणण्यासाठी तसेच सासवडमध्ये एज्युकेशन हब उभारण्यासाठी झेंडेंना निवडून दया, असे आवाहन त्यांनी केले.
धार्मिक पर्यटनवाढीसाठी प्रत्यत्न
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश मधून लाखो भाविक आपल्या जेजुरीमध्ये येत असतात. जवळपास 50-60 टक्के लोकांचा व्यवसाय हा मंदिरासंबंधी निगडित आहे. भविष्यात धार्मिक पर्यटन वाढीसाठी मी सर्वतोपारी प्रयत्न करेन, यासाठी जास्तीत जास्त मते घड्याळाला द्यावी आणि मला बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन संभाजी झेंडे यांनी केले.





