पुणे जिल्हा : इंदापूर, माळशिरस तालुक्याचे राजकीय- सामाजिक ऋणानुबंध – जगदाळे

खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांचा इंदापुरात सन्मान
इंदापूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा दणदणीत विजय झाला. त्यांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,निरा भिमा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांच्या हस्ते खासदार माने यांचा सन्मान करण्यात आला.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला खासदार धर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच भेट दिली.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांचा सन्मान सोहळा पार पडला.राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच बाजार समितीचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, खऱ्या अर्थाने इंदापूर व माळशिरस तालुक्याचे राजकीय सामाजिक ऋणानुबंध,राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कायम राहिले आहेत. मोहिते पाटील, घराणे समाजसेवेत आजपर्यंत कधीही कमी पडलेले नाही. त्यामुळे जनतेचा खासदार म्हणून धर्यशील मोहिते पाटील यांना जनतेने कौल दिला, असे गौरवोद्गार जगदाळे यांनी काढले.
बारामती लोकसभा, माढा लोकसभा या दोन्हीही मतदारसंघातील खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे असल्यामुळे विजय झाल्यामुळे पक्षअध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, चौफेर विकास होईल असा विश्वास कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी व्यक्त केला.





