Pune District : सिरम कंपनीमध्ये कामगारांना भरघोस वेतनवाढ

सोरतापवाडी : पुण्यातील नामांकित आणि जागतिक दर्जाची सिरम् इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील कामगारांचा भरघोस असा वेतनवाढ करार झाला आहे.
कंपनी व्यवस्थापन व सिरम एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये चर्चा होऊन तीन वर्षासाठी करार शांततेत पार पडला. कंपनी व्यवस्थापन आणि कामगार युनियन प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार कंपनीने कामगारंना भरघोस अशी पगारवाढ करून देखील इतरही अनेक कामगार हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने सर्व कामगारांमध्ये आनंद व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या कंपनीचे चेअरमन डॉ. सायरस पूनावाला व सीईओ आदर पूनावाला हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
त्यामुळेच त्यांना अनेक पारितोषिकांनी सन्मानित केले गेलेले आहे. हडपसर नगरी व महाराष्ट्रातील जवळपास 9 ते 10 हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह तसेच हाताला रोजगार निर्माण करून देण्याचे काम या कंपनीमुळे झालेले आहे.
करारावर व्यवस्थापना तर्फे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख संचालक महेंद्र ईंगे, सिनीयर मॅनेजर प्रवीण गरकल, मॅनेजर कॅप्टन विशाल म्हात्रे व सिनीयर मॅनेजर लक्ष्मीकांत ख्रिस्ती तसेच सिरम् एम्प्लॉईज युनियनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष व विद्यमान सदस्य सचिन गोपीनाथ तुपे, अजित खैरे, अजित भिंताडे, प्रवीण घुले, अतुल कदम, सचिन गायकवाड, गिरीश मोरे यांनी नवीन कामगार वेतनवाढ करारावर सही करून उपस्थित सर्वाचे आभार मानले.





