Pune District : भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या दहीहंडीला अलोट गर्दी

दहीहंडी फोडण्याचा मान महात्मा फुले दहीहंडी संघाने पटकावला
इंदापूर – इंदापूर शहरात श्री भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने, आयोजित दहीहंडी उत्सवाला गोविंदा पथकातील हजारो युवकांनी व तालुक्यातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत, गोपाळकाला गोड झाला गोपाळांनी गोड केला असे म्हणत, शिस्तबद्ध पद्धतीने, अलोट गर्दीत दहीहंडी यशस्वी पार पडली.
बाजार समितीच्या प्रांगणात सोमवारी (दि. 18) भरतशेठ शहा मित्र परिवाराची दहीहंडी पार पडली. उपस्थितांचे स्वागत इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा व मित्र परिवाराने केले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, शहा ग्लोबल स्कुलचे विश्वस्त मुकुंद शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ व मान्यवारांच्या हस्ते, महात्मा फुले दहीहंडी संघाला पाच फूट उंच, सन्मानचिन्ह व रोख स्वरूपात बक्षीस देवून गौरविण्यात आले.
दहीहंडी सोहळा सुरू होण्या अगोदर ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर, रोहित माने, वनिता खरात, नम्रता संभेराव या प्रसिद्ध कलाकारांचा विनोदांचा बहारदार कार्यक्रम झाला. प्रसिद्ध सिनेस्टार आणि नृत्यांगना मीरा जोशी यांचा बहारदार नृत्यविष्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इंदापूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी, महिला भगिनींनी, या महोत्सवात मोठी दाद दिली.
दहीहंडी उत्सवात सहभागी गोविंदा पथके
यामध्ये महात्मा फुले दहीहंडी संघ इंदापूर, तिरंगा दहीहंडी संघ इंदापूर, स्वराज्य दहीहंडी संघ शिरसोडी, न्यू व्यंकटेश दहीहंडी संघ इंदापूर, मालोजीराजे दहीहंडी संघ इंदापूर, शिवशंभो दहीहंडी संघ इंदापूर यांनी सहभाग घेतला होता.





