संभाजीराव झेंडे : बेलसर येथे प्रचारार्थ सभा बेलसर – पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची पहिली लढाई झाली होती या ठिकाणी स्वराज्याच्या पहिल्या लढाईचे स्मारक बनवून पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. माजी मंत्र्यांनी गुंजवणीच्या नावाखाली जनतेला 10 वर्षे फसवले आहे तर गुंजवणीच्या सर्व्हेमध्ये बेलसर, निळूज वाळुंज खळद ही गावे नाहीत. अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुंजवणीच्या सर्व्हेचे काम केल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी सांगितले. बेलसर (ता. पुरंदर) येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित सभेत झेंडे बोलत होते. यावेळी शिवरी, खळद, बेलसर, कोथळे, नाझरे सुपे, नाझरे कडेपठार, मावडी, पिंपरी, मावडी कडेपठार, कोळविहरे, राख, नावळी, गुळूंचे, कर्नलवाडी या गावांमध्ये जनसंवाद यात्रा संपन्न झाली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामठे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांताराम कापरे, कैलास जगताप संतोष जगताप, सनी मारणे संदेश पवार, मधुकर रासकर, नलिनी कामठे, शंकर काळाणे, नारायण शिंदे, विलास चव्हाण, आत्माराम कामठे, भगवान लिंभोरे, मनोज कामठे, मालोजी कामठे, तुकाराम कामठे, सुनील सोनवणे, प्रमोद जगताप, सुखदेव कामठे, अंकुश कामठे, सतीश कामठे, व्यापारी महादेव कामठे, बबन कादबाने, संगम जगताप, नवनाथ कामठे, नितीन काळाने, विशाल कामठे, अजित कामठे, उपस्थित होते. बारामती येथे एक हजार कोटी रुपयांचे मेडिकल कॉलेज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आले त्याच धरतीवर पुरंदर तालुक्यातल करण्यात येईल. पुरंदर तालुका हा शिक्षणाचा हब म्हणून ओळखला जावा यासाठी प्रयत्न केले जातील. शेतकर्यांना विश्वासात घेऊनच विमानतळाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. – प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, जिल्हा बँक