Pune District : वृक्षारोपणातून अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

दि बारामती मर्चंट्स असोसिएशनचा उपक्रम
बारामती – दि बारामती मर्चंट्स असोसिएशनने वृक्षारोपण उपक्रमाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या यांचा 66 व्या वाढदिवस साजरा केला. सामाजिक उपक्रमातून अजित पवारांना यांना शुभेच्छा दिल्या.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवत अजित पवारांच्या दूरदृष्टीचा आदर्श ठेवत त्यांच्या कार्याला सामाजिक उपक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराव किर्वे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे, माजी उपसभापती निलेश लडकत,
असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळासाहेब फराटे, महावीर वडुजकर, सचिन सातव, निलेश भिंगे, निलेश दोशी, मिलिंद सालपे, संतोष मेहता, राहुल बेदमुथा, सिद्धार्थ गुगळे, अमोल पिसाळ, यश संघवी, विशाल वडुजकर, रणजीत फराटे, दीपक मचाले, कल्पेश सोनवणे, संदीप आहेर आदी व्यापारी उपस्थित होते. यापुढेही अशीच सामाजिक भान जपत असोसिएशन विविध उपक्रम राबवत राहील, असा विश्वा यावेळी व्यक्त करण्यात आला.
बारामती : वृक्षारोपण उपक्रमाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छ देण्यात आल्या.





