Pune District : फुलेंचा वारसा असलेल्या तळेगावात अभिवादन

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती तळेगाव ढमढेरे येथील उपबाजार समितीच्या आवारातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिरूर हवेलीचे माजी आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढरे, पुणे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच स्वाती लांडे, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा विद्या भुजबळ, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ,
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती यशवंत ढमढेरे, पंचायत समिती माजी सदस्य अरुण भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट, खरेदी- विक्री संघाचे संचालक संभाजी भुजबळ, शहाजी ढमढेरे, ज्येष्ठ नागरिक माळी महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन तोडकर, सहकार आघाडीचे अध्यक्ष सुहास भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते संपत ढमढरे, दादाभाऊ शिनलकर,पांडुरंग नरके, ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले प्रतिष्ठान, ग्रामपंचायत, सिद्धार्थ विकास मंडळ, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, तळेगाव ढमढेरे कार्यकारी सोसायटी व जयवंतराव भुजबळ विविध कार्यकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते .
चार दिवस भरगच्च कार्यक्रम
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त बाजार मैदान येथे शुक्रवार (दि.11) ते सोमवार (दि.14) पर्यंत शालेय वक्तृत्व स्पर्धा, क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, मिरवणूक सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ विकास मंडळ यांच्यातर्फे करण्यात आलेली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य मनोज अल्हाट यांनी सांगितले.





