Pune District : जिल्हा युवा मोर्चाच्या कार्यकारी अध्यक्षपदी गणेश कवडे

ओझर : श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांची भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसे नियुक्तीचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार विक्रांत पाटील, राजेश पांडे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुप मोरे, पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष व आमदार शंकर जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, पुणे शहराचे शहराध्यक्ष धीरज घाटे, जिल्हा सरचिटणीस ताराचंद कराळे, जिल्हा सरचिटणीस संजय रौंदळ, जिल्हा सरचिटणीस आशिष माळवदकर, उपजिल्हाध्यक्ष भगवानराव घोलप, आशा बुचके, संतोष खैरे, डॉ. पंजाब कथे, दिलीप गांजळे उपस्थित होते.गणेश कवडे म्हणाले की, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः अशाप्रकारे भारतीय जनता पक्षाचे जे ब्रीद वाक्य आहे त्याप्रमाणे माझ्याकडून कार्य होईल.
मला दिलेल्या कार्यक्षेत्रात युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आणि पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी तसेच भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे, असे त्यांनी नमूद केले.





