Pune District : आळंदीत 800 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

आळंदी : शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 9) धाकटे पादुकासमोरील आत्मउन्नती विश्वशांती सोमेश्वर मठात शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण यांनी मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, आरोग्य तपासणी विशेष शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये 800पेक्षा अधिक नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी केली व चष्मे मिळवले.
आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक डी. डी. भोसले, सचिन गिलबिले, प्रकाश कुर्हाडे, दिनेश घुले, नंदकुमार वडगावकर, सोमेश्वर मठ व्यवस्थाप ढवळे काका आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपनेते इरफान सय्यद यांनी फोनवरून शिबिरास शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्ञानेश्वर रायकर, मनोहर दिवाने, ज्ञानेश्वर घुंडरे, रोहिदास कदम, विनायक महामुनी, नितीन ननवरे, सायरा शेख, पुष्पा कुर्हाडे, मनिषा थोरवे, श्रद्धा थोरवे, शंकर महाराज फपाळ, डॉ. विकास थोरवे, संतोष सानप, सुरेश इंगवे, किरण कोल्हे, मयूर भांबरे, राहुल थोरवे, विजय गवते, संगिता फपाळ, मंगल हुंडारे, माऊल महाराज पडघम, प्रदिप कुरे आदी ज्ञानेश्वर गारकर, नायर हॉस्पिटल डॉ.अंजलीताई परांडे उपस्थित होते.
शिबिरात नेत्र तपासणीसाठी सुर्या ऑप्टिकल्सचे अनुभवी नेत्रतज्ञ डॉ. खुशांत त्रिवेदी यांनी 400 नागरिकांची नेत्र तपासणी करुन आवश्यकतेनुसार 350 नागरिकांना चष्मे देण्यात आले. तसेच, आरोग्य तपासणी शिबीरात कमलेश हॉस्पिटल डॉ. भुषण जगताप, डॉ अक्षय शिंगणे, स्वास्थ्यम मेडिकल अॅण्ड सोशल फाउंडेशन डॉ. निलेश जगदाळे अशा तज्ञ डॉक्टरांनी 400 नागरिकांच्या रक्तदाब, शुगर, थायरॉईड यासारख्या तपासण्या करून मार्गदर्शन केले.





