Pune District : 3545 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी

कळस : कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील 51 गावातील 3545 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषध उपचार करण्यात आला. दि.23 डिसेंबर 2024 ते 23 जानेवारी 2025 या 32 दिवसांमध्ये हा विक्रमी आरोग्य तपासण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला एक महिना पूर्ण झाला असल्याची माहिती या केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण यांनी दिली.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, कर्मयोगीचे चेअरमन, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये प्रथमच ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी केली. उसाच्या फडामधेच जाऊन औषधोपचार केले जातात.
या उपक्रमास सर्वतोपरी सहाय्य शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचा फिरता दवाखाना या ट्रस्टचे सचिव डॉ. गिरीष देसाई, खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर, ट्रस्टचे मार्गदर्शक हमीदभाई आतार या सर्वांच्या सहकार्याने फिरता दवाखाना ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी प्रत्यक्षात शेतकर्यांच्या बांधावर जाऊन जिथे ऊसतोड चालू आहे. अशा ठिकाणी ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार केले जातात. ही संकल्पना चॅरिटेबल ट्रस्टमुळे महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय ठरली.
या उपक्रमासाठी कर्मयोगीचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, कर्मयोगीचे ओ. एस शरद काळे, कर्मयोगीचे, शेतकी अधिकारी किशोर हिंगमिरे सर्व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी केली जाते. केंद्राच्या प्रमुख डॉ. सारंगी कुंभार, नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी, वॉर्डबॉय आनंद नलावडे, केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण आणि सहायक, शिवाजीराव गोफणे, कर्मयोगीचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकी विभागाचे सर्व अधिकारी, या सर्वांच्या सहकार्याने कालठण, शिरसोडी, इंदापूर, शेळगाव, भिगवण या सर्व विभागातील अधिकार्यांचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी संपन्न झाली.




